नेले
ता. जि. सातारा
नेले हे गाव सातारा जिल्ह्यातील एक प्रगतिशील ग्रामपंचायत आहे. हे गाव सातारा पासून 7 किमी अंतरावर स्थित आहे.
मौजे नेले हे सातारा जिल्ह्यातील प्रगतशील गांव आहे. हे गांव सातारा शहरापासून ७ कि.मी. अंतरावर वेण्णा नदीच्या तिरावर वसलेले आहे. नेले हे गांव महाराष्ट्रातील सामाजिक, आध्यात्मिक, राजकीय, शैक्षणिक, क्रांतीकारी गांव म्हणून ओळखले जाते.
गावामध्ये सर्व धर्माची लोक गुण्यागोविंदाने राहतात, गावचे भौगोलिक स्थिती पाण्याचे समृद्ध असलेले गांव बागायत शेतीने परिपुर्ण आहे.
गावचे मुख्य ग्रामदैवत श्री भैरवनाथ व श्री जठाशंकर ही मुख्य मंदिरे असून, हजरत दावल मलिक आणि शादावल बाबा दर्गा महाराष्ट्रातील प्रसिद्ध दर्गा आहे. गावातील अनेक धार्मिक उत्सव साजरे केले जातात, गावातून वाहणारी वेण्णानदी आणि आरफळ सुपर डावा कालवा यामुळे गाव बागायत शेती उत्पन्नाने समृद्ध झाले आहे. गावामध्ये श्री जठाशंकर मंदिर घाट आणि घाटावर अनेक स्वयंभू पिंडी नी समृद्ध असलेले आध्यात्मिक पर्यटन क्षेत्र म्हणून ओळखले जाते.
गावात साजरे होणारे उत्सवामध्ये माघ अमावस्या व वैशाख पोर्णिमा या तिथींना ग्राम दैवतांची यात्रा विभागातील सर्वात मोठी यात्रा असल्याने महाराष्ट्रातील सर्व भाविक या यात्रेत सहभागी होतात. गावातून निघणारी पंढरपूर वारी ही पंचक्रोशीतील सर्वात मोठी दिंडी म्हणून वारकरी सांप्रदायातील लोकांसाठी पर्वणी आहे. तसेच गावात भरणारा ऊरूस हा मुस्लीम बांधवांसह सर्व धर्मातील लोकांसाठी पर्वणीच आहे. या उत्सवासाठी महाराष्ट्रातील कान्याकोपऱ्यातून मुस्लिम बांधव एकत्र येतात. अश्या समृद्ध गावाला महाराष्ट्र शासन तर्फे पुरस्कृत करून गौरविले आहे.
ग्रामपंचायत द्वारे विविध सरकारी योजनांची अंमलबजावणी केली जात आहे. या योजनांद्वारे ग्रामीणांच्या जीवनमानात सुधारणा होण्यास मदत होते.
सर्व योजनाग्रामपंचायतच्या विकासासाठी आमचे पदाधिकारी आणि सदस्य सतत काम करत आहेत.
सर्व पदाधिकारी